Header Ads


आधारकार्ड वरीव नाव, पत्ता ,जन्मतारीख बदलणे

आधार कार्डावरील नाव, पत्ता, बदल किंवा आणखी इतर काही बदल करायचा असेल तर हे सर्व आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनही करू शकता. (If You want to upadate AADHAR CARD DETAILS)

If You want to upadate AADHAR CARD DETAILS
त्यासाठी खालील दिलेली माहिती वाचा,
१.  https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा.
२. 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा.
३. नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता.
  पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीनं.
  आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं.
४. 'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील 'Update Aadhaar Data' या ऑप्शनवर क्लिक करा.
५.  नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील. आणि त्यांची उत्तरंही.
(१)  ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
(२) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here'  वर क्लिक करा.
(३) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
६. यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर 'Click Here' वर क्लिक करावं लागेल.
७. यानंतर 'Aadhaar Self Service Update Portal' ओपन होईल. तिथे तुम्हाला अगोदर ज्या आधार कार्ड वरील माहितीची सुधारणा करावयाची आहे त्या आधार कार्ड वरील '12 अंकांचा आधार क्रमांक' टाकावा लागेल.
८. त्यानंतर  टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 'OTP' चा मेसेज येईल.
९.  त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहितीमध्ये बदल करावयाचा आहे त्यावर क्लिक करा
१०.  'Data Update Request'  ओपन झाल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
११. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसेल, त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा.
१२. सबमिट केल्यानंतर  'Document Upload'  चा भाग समोर येईल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकता.
१३. तिथेच तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
१४. यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज येईल, या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्टची स्थिती पाहू शकता.

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.