Header Ads


कमी पटसंख्येच्या शाळा बंद होऊ देणार नाही-छञपती संभाजीराजे

कमी पटसंख्येच्या  शाळा बंद होऊ देणार नाही-छञपती संभाजीराजे

लातूर :  शून्य ते २० पटसंख्येच्या शाळा बंद होऊ देणार नाही. त्यासाठी स्वराज्य संघटना लढा देईल, असा इशारा *छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी* त्यांनी गुरुवारी सायंकाळी येथे दिला. 
शिक्षक प्रतिनिधी (शिक्षक काँग्रेस) सभेद्वारे आयोजित सोहळ्यात माजी मंत्री *मा.श्री. दिलीपरावजी देशमुखांनी साहेबांना* *"सहकार भूषण"* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण यावर महत्त्वपूर्ण विवेचन केले. ते म्हणाले, शिक्षकांनी इतिहासाचे आत्मचिंतन करून नव्या पिढीला विचार द्यावेत. पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणावी. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी उत्कृष्ट शिक्षक व शाळांना *विकासरत्न विलासराव देशमुख पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार *आ. विक्रम काळे साहेब,* तर मंचावर लातूर ग्रामीणचे *आ. धिरजभैय्या देशमुख साहेब* शिक्षक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष *कालिदास मानें* विद्यार्थी आघाडी छावा संघटना  प्रदेशाध्यक्ष  *विजयकुमार घाडगे पाटील*  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष *श्रीपतराव काकडे*, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष *रामदास पवार*, शिक्षक सभेचे जिल्हाध्यक्ष *केशव गंभीरे*  जिल्हा सरचिटणीस  *सुरेश सुडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.
    *दीपशिखा देशमुख यांना वाचन प्रेरक पुरस्कार....*
 रीड लातूर उपक्रम राबवून शाळांमधून विद्याथ्यापर्यंत पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या दीपशिखा देशमुख यांना छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते *वाचन प्रेरक*  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून, यालाच शिक्षणात प्राधान्य असले पाहिजे, असे मत मांडले. 
यावेळी *आ. धीरज देशमुख*  यांनी जिल्हा बँक शिक्षकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देणार असल्याचे सांगितले, तर *आ. विक्रम काळे*   यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
*यशाचे शिल्पकार शिक्षक*
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, यशाचे शिल्पकार शिक्षकच असतात. त्यांनीच लातूर पॅटर्न प्रसिद्ध केला. लातूर शैक्षणिक हब आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मिळालेला सहकारभूषण पुरस्कार मोठा हा सन्मान आहे. कार्यक्रमाचे सुञसंचलन *मंदाकिनी गंभीरे,* *प्रवीण गिरी*  यांनी केले.आभार *सुरेश सुडे* यांनी मानले
      कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  शिक्षक कांग्रेस  पदाधिकारी *_केशव गंभीरे,सुरेश सुडे,श,श्री.अंगद सावंत सर श्री.संजय बिरादार सर,श्री संजय आलमले,श्री. रमाकांत जाधव  श्री.राजकुमार स्वामी श्री.शंकरराव कदम ,श्री.विठुभाऊ चव्हाण श्री.विजयकुमार कोदळे,श्री.ढेंकरे प्रदीप सर,श्री.प्रताप सोमवंशी  सर,श्री.विकास माने सर,श्री.उत्तम शेळके सर, श्री. बालाजी सर्जे सर, श्री.सुजित शिरुरे, श्री.शेख अल्लाबख्श,श्री नजीउल्ला शेख सर श्री.अनिल बोधले सर श्रीहरी रणखांब सर, दत्तात्रय चिवडे सर,श्री.नरसींग फेसाटे सर,श्री.चापटे बालाजी सर,श्री.मेटे बबनराव सर,श्री.चांकूंडे विष्णू सर,श्री.सुर्यवंशी शाहुराज सर,श्री.दयानंद बिराजदार सर,श्री.प्रकाश जाधव सर,श्री.कोतागडे गोपाळ सर_*,
महिला आघाडी *_श्रीम.माधुरी वलसे मॅडम,श्रीम.शामल कुलकर्णी मॅडम,श्रीम.संगिता पवार मॅडम,श्रीम.क्षिरसागर मीना मॅडम,श्रीम.देशमुख चंद्रकला मॅडम,श्रीम छाया पुरी,मडम,  श्रीम.जगदाळे ज्योती मॅडम,श्रीम.हेऺडगे उमा मॅडम,श्रीम.जयलक्ष्मी मजगे - येडवे मॅडम,श्रीम.चापटे - पवार मॅडम,श्रीम.शिऺदे वर्षा मॅडम* यांनी मेहनत घेतली व कार्यक्रमांसाठी लातूर जिल्ह्यातील हजारों शिक्षकांची उपस्थिती होती.ज्यांना पावसामुळे कार्यक्रम  पाहता आला नाही त्यांनी या लिंकवर पुरस्कार कार्क्रम LIVE पहा पाहू शकता

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.