Header Ads


कमी प्रकाशात उत्तम फोटो येण्यासाठी खास 5टिप्स

कमी प्रकाशात उत्तम फोटो येण्यासाठी खास '५' टिप

युजर्सचा फोटोग्राफीचा आनंद वाढवण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या नवनवे फीचर्स सादर करत आहेत. तरी देखील अनेक फोनमध्ये रात्रीच्या वेळी चांगले फोटोज येत नाहीत. मात्र कमी प्रकाशात चांगला फोटो काढण्यासाठी काही खास टिप्स.

HDR ऑन करा :

रात्री फोटो काढताना HDR फीचर ऑन करा. हे फीचर लाईट बॅलन्स करून चांगला फोटो येण्यास मदत करेल. 

ISO अड्जस्ट करा :

हे फीचर साधारणपणे सर्व स्मार्टफोन्समध्ये आढळून येते. त्यामुळे कमी प्रकाशात देखील चांगला फोटो येईल. मात्र फोटो काढताना ते अड्जस्ट करा. ISO वाढवून तुम्ही उत्तम फोटो काढू शकता. 

फ्लॅश लाईट ऑफ करा :

कमी प्रकाशात फोटो काढताना फ्लॅश लाईट बंद करा. कारण अनेकदा कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटमुळे फोटो बिघडतो. 

कॅमरा अॅप ट्राय करा :

फोनमधील  इन-बिल्ट कॅमेऱ्याशिवाय तुम्ही इतर कॅमेरा अॅप्सचा देखील वापर करू शकता. त्यामुळे कॅमेऱ्यापेक्षा फोटोज चांगले येतील. 

ब्लॅक अँड व्हाईटचा वापर :

लो लाईटमध्ये फोटोग्राफी करताना ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरचा वापर करा. त्यामुळे फोटो उत्तम येईल. 

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.