Header Ads


हरवलेला मोबाईल कसा शोधावा ?

*हरवलेला मोबाईल कसा शोधावा?*

       मी एक फार महत्वाची आणि उपयोगी माहिती आणली आहे. तर मी आज सांगणार आहे IMEI No.  च्या साह्याने हरवलेला मोबाईल शोधायचा कसा.? 

आहे कि नाही कामाची माहिती. आपल्या मोबाईलचा IMEI No. हा पावती व बॉक्स वर नमूद केलेला असतो किंवा IMEI No. जाणून घेण्यासाठी डायल करा *#06#.

ब-याच वेळेस आपण ऐकेलं असत कि मोबाईलच्याIMEI No. चा उपयोग करून हरवलेला मोबाईल शोधू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपण आपला मोबाईल सध्या कोणत्या ठिकाना वरून ऑपेरेट केला जात आहे याची Location Details मिळवू शकतो.

आपल्या हरवलेल्या मोबाईलची Location Detailsमिळवण्यासाठी आपल्याला एक मेल करावी लागणार आहे. 

सर्वप्रथम नवीन इमेल लिहण्यास सुरुवात करा

To: या रकान्यात "cop.mobile@India.com" हा अड्रेस टाका.

Subject: सब्जेक्ट मध्ये "LOST PHONE DETAILS" हे टाका.

आता 

बॉडी मध्ये 

Name: ( येथे तुमचे पूर्ण नाव लिहा )

Address: ( येथे तुमचा पत्ता लिहा )

Phone Model : ( तुमच्या मोबाईल चा मोडेल नंबर लिहा )

Make: ( तुमच्या मोबाईल च्या कंपनीचे नाव लिहा )

Last used No: ( तुम्ही त्या मोबाईल वर शेवटचा वापरलेला नंबर )

Email for Communication: ( तुमचा चालू मेल पत्ता)

Missed Date : (मोबाईल हरवल्याचा दिनांक)

IMEI No: (तुमच्या मोबाईलचा IMEI No. )

मेल पाठवून द्या.

 तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईलची Location Details 24 तासाच्या आत मिळेल.

हरवलेला स्मार्टफोन कसा शोधावा

आपण दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा नियमित वापर करीत असतो. दुर्दैवाने आपण एखाद्या वेळी फोन एखाद्या ठिकाणी विसरून जातो, किंवा फोन कोठे गहाळ झाला हे आपल्याला लक्षात येत नाही. अर्थात अशी वेळ कोणावर ओढवू नये पण अशी वेळ ओढवल्यास काय करता येईल याची पूर्वतयारी केल्यास आपल्याला होणारा मनस्ताप कमी करता येतो.

गूगल कंपनीने एंड्राइड स्मार्टफोन मध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या सोयींचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो हे बहुतेक जणांना माहितही नसेल. या गोष्टींची आज आपण माहिती करून घेऊ.

या सोयींचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे कुठलाही एंड्राइड स्मार्टफोन असेल आणि एक जीमेल अकौंट असावा लागतो. जर तुम्ही जीमेल वापरत नसाल आणि  एंड्राइड स्मार्टफोन  वापरत असाल तर त्वरित खालील लिंक वर एक नवीन अकौंट उघडून घ्या. https://mail.google.com/

तुमच्याकडे गूगल अकौंट असेल तर तुम्ही पुढील सुविधांचा वापर करू शकता. ( जीमेल अकौंटलाच गूगल अकौंट असे म्हंटले जाते.)

पहिल्यांदा आपण  एंड्राइड स्मार्टफोन वरील सेटिंग्ज पाहू.
यामध्ये दोन प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. एक म्हणजे आपला फोन हरवल्यास त्याला दुरून लॉक करणे, फोनची रिंग लांबून वाजवता येणे, तसेच फोनवर लॉक करून समोरील व्यक्तीला आपला कॉनटॅक्ट स्क्रीन वर दिसेल व आपण लिहिलेला मेसेज त्याला दिसेल असे करणे. म्हणजे समोरील व्यक्तीला आपल्याला त्या फोन वरून कॉल करता यावे.

दुसरी सोय अशी आहे कि आपला फोन नेमका कोठे आहे हे इतर फोनवर किंवा कॉम्प्युटर वर पाहता येणे. यासाठी तुम्हाला तुमच्या गूगल अकौंट मध्ये लॉग इन  करावे लागेल, हे तुम्ही कॉम्प्युटर वर खालील लिंक वर क्लिक करून लॉग इन करू शकता.
https://www.google.com/android/devicemanager

आणि जर तुम्ही संगणका ऐवजी दुसऱ्या स्मार्ट फोन वर ही माहिती पाहणार असाल तर त्यासाठी एंड्राइड डिवाइस मॅनेजर या अॅपचा  वापर करावा. हे अॅप तुम्ही या लिंक वरून इंस्टाल करू शकता. किंवा गूगल प्ले स्टोर मध्ये "android device manager" या नावाने शोधा.

यापैकी जर तुम्हाला आपल्या फोन चे लोकेशन ट्रेस करायचे असेल तर तुम्हाला लोकेशन एक्सेस साठी तुमच्या सेटिंग मध्ये परवानगी द्यावी लागेल.

यासाठी तुम्हाला गूगल सेटिंग मध्ये जावे लागेल. हा आईकोन खालील प्रमाणे दिसतो.

जर आईकोन तुमच्या फोनवर दिसत नसेल तर अॅप ड्रावर मध्ये पहा.
गूगल सेटिंग्स मध्ये "Locaion" सेलेक्ट करा. यामध्ये "access location" हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला तुमच्या फोनचे लोकेशन ट्रेस करता येईल.

यानंतर Settings उघडा. साधारणपणे डाव्या बाजूचे बटन दाबल्यावर सेटिंग्स उघडतात. किंवा  अॅप ड्रावर मध्ये "सेटिंग्स" च आइकॉन शोधा.

सेटिंग्स मध्ये लोकेशन एक्सेस निवडा. अणि त्यामध्ये "Access to my location" याला परवानगी दया. यामध्ये "GPS satellites" व WI-FI तसेच "mobile network location" यासाठी वेगळी परवानगी द्यावी लागते.
या सार्या सेटिंग्स करून ठेवल्यास तुमच्या दैनदिन हालचाली देखील रेकोर्ड होतील. तुम्ही एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी किती वाजता पोहोचलात हे देखील तुम्हाला केव्हाही नकाशावर पाहता येईल. याला "location history" असे नाव आहे. ही माहिती तुम्ही खालील पानावर लॉग इन करून पाहू शकता.

https://maps.google.co.in/locationhistory/

तुम्ही केव्हाही "Android Device Manager" च्या वेब साईट वरून किंवा अॅप वरून तुमच्या फोनचे लोकेशन पाहू शकता. त्याची रिंग वाजवू शकता, लॉक करू शकता, तसेच त्या फोनच्या स्क्रीन वर तुमचा मेसेज व काँटेक्ट नंबर पाठवू शकता.

No comments

Theme images by rajareddychadive. Powered by Blogger.